स्मार्टफोन आणि टॅब्लेट सारख्या Android डिव्हाइसेससाठी विनामूल्य Zoho Sheet अॅप वापरून तुमच्या स्प्रेडशीटवर विनामूल्य निर्मिती करा, एडिटिंग करा, शेअर करा आणि सहकार्य करा. ऑफलाइन आणि ऑनलाइन दोन्ही पद्धतीने काम करा.
हे एक स्वतंत्र स्प्रेडशीट ॲप्लिकेशन आहे, आम्ही तुमचे क्रेडिट किंवा डेबिट कार्ड यासोबत लिंक करण्यासाठी सांगत नाही आणि नंतर लपवलेले शुल्क आकारत नाही—हा संपूर्णपणे विनामूल्य अनुभव आहे.
तुम्ही ऑनलाइन काम करत असलात, तरच तुम्हाला साइन अप करण्याची गरज असते. ऑफलाइन काम करायचे आहे? लगेच सुरू करा—साइन अप करण्याची गरज नाही.
Zoho Sheet वापरून तुम्ही हे सर्व करू शकता:
नवीन स्प्रेडशीट तयार करणे आणि त्यांना थेट ॲपमधून संपूर्णपणे व्यवस्थापित करणे.
तुम्हाला पाहिजे तसे फाइल्सना क्लाउडवर ॲक्सेस करा किंवा तुमच्या डिव्हाइसवर ऑफलाइन काम करा.
तुमच्या डिव्हाइसवरील किंवा Box आणि DropBox सारख्या क्लाउड ॲप्सवरील MS Excel फाइल्स (XLSX, XLS, XLSM, and XLTM), तसेच CSV, TSV, ODS आणि इतर फॉरमॅटमधील फाइल्स उघडा आणि एडिट करा.
चित्रातील डेटा (Data from Picture) वैशिष्ट्य वापरून बिले, इनव्हॉइस, रिसिट इ. साठी स्प्रेडशीट तयार करा.
तुमचे कागदोपत्री रेकॉर्ड स्कॅन करून त्यांवरून काही सेकंदांत स्प्रेडशीट तयार करा.
आमच्या रेडीमेड स्प्रेडशीट टेम्पलेट वापरून तुमच्या टाइमशीट्स, बजेट स्प्रेडशीट्स आणि अशा इतर फाइल्स झटपट सेट अप करा.
सहकाऱ्यांसोबत तुमच्या स्प्रेडशीट शेअर करा, निरनिराळ्या पातळीच्या परवानग्या सेट करा आणि रीअल टाइममध्ये एकत्र काम करा.
कॉमेंट जोडा—सेल किंवा रेंजच्या पातळीवर—आणि @mentions वापरून सहकाऱ्यांना टॅग करा आणि टीमवर्क सुधारा.
निरनिराळे डेटा पडताळणी टूल्स वापरून डेटाच्या अचूकतेची खात्री करा.
सर्व मूलभूत टूल्स वापरून तुमचे सेल्स फॉर्मॅट करा, क्रमवारी लावा, फिल्टर करा आणि नियमांवर आधारित फॉरमॅटिंग लागू करा.
350 पेक्षा अधिक फंक्शन आणि फॉर्म्युले वापरून आकडेमोड करा—VLOOKUP आणि XLOOKUP पासून IF आणि असे अनेक फंक्शन आहेत.
35 पेक्षा अधिक प्रकारचे चार्ट वापरून तुमचे निष्कर्ष व्हिज्युअलाइझ करा.
Zia या आमच्या स्वतःच्या कृत्रिम बुद्धिमत्तेला कठीण कामे करू द्या, स्मार्ट डेटा विश्लेषण सूचना मिळवा, चार्ट आणि पिव्हट टेबल्स आपोआप जनरेट करा आणि बोलून प्रश्न देखील विचारा.
तुमचे प्रत्येक काम आपोआप आणि सुरक्षितपणे सेव्ह केले जाते याची खात्री बाळगा.
निरनिराळ्या प्लॅटफॉर्मवर तुमचा डेटा सिंक करा
Zoho Sheet वेबवर आणि iOS वर देखील उपलब्ध आहे. सर्वात चांगली गोष्ट? डेटा लगेच आणि आपोआप सिंक केला जातो, ज्यामुळे तुम्ही पाहिजे तेव्हा प्लॅटफॉर्म बदलू शकता.
Zoho चे गोपनीयतेचे वचन
तुमच्या गोपनीयतेचा सन्मान करणे एक कंपनी म्हणून नेहमीच आमच्या तत्त्वांमध्ये केंद्रस्थानी आहे. आमच्या 25+ वर्षांच्या इतिहासामध्ये आम्ही कधीच वापरकर्त्यांची माहिती कोणालाही जाहिरातींसाठी विकली नाही किंवा तृतीय पक्ष जाहिराती दाखवून कमाई केलेली नाही. तुमच्या स्प्रेडशीटचा डेटा तुमचाच राहतो.
व्यवसायांसाठी Zoho ॲडव्हांटेज
Zoho Sheet हे Zoho ऑफिस सुईटमधील स्प्रेडशीट सॉफ्टवेअर आहे, ज्यामध्ये वर्ड प्रोसेसिंगसाठी Zoho Writer आणि प्रेझेंटेशनसाठी Zoho Show देखील आहेत. तुम्ही Zoho Sheet साठी साइन अप करता, तेव्हा तुम्हाला तुमच्या शीट्स, प्रेझेंटेशन आणि मजकूर दस्तऐवज एकाच ठिकाणी व्यवस्थापित करण्यासाठी अनेक प्रकारचे टूल्स मिळतात. हे Zoho WorkDrive आणि Zoho Workplace यांचा एक भाग सुद्धा आहे. Zoho WorkDrive एक ऑनलाइन फाइल स्टोरेज व सहकार्याचे टूल आहे, तर Zoho Workplace ईमेल आणि सहकार्याचा सुईट आहे.
Zoho चे सिंगल साइन ऑन खाते वापरून तुम्ही तुम्हाला पाहिजे असलेल्या सर्व Zoho ॲप्स सहज ॲक्सेस करू शकता. आमच्या इकोसिस्टममध्ये निरनिराळ्या व्यावसायिक श्रेणींमध्ये सध्या 55+ ॲप्स आहेत—विक्री, मार्केटिंग, ईमेल व सहकार्य, फायनान्स, HR आणि इतर बरेच काही.
अधिक माहितीसाठी येथे भेट द्या: https://www.zoho.com/sheet/mobile.html
तुम्हाला ॲप वापरून पाहण्याआधी किंवा वापरत असताना प्रश्न विचारायचे असल्यास, आम्हाला
[email protected] येथे कळवा.